ब्रेकिंग! सोलापूर महापालिकेची निवडणूक चार सदस्य पद्धतीने होणार

Admin
1 Min Read
  • ड वर्ग महापालिकेची प्रभाग रचना चार सदस्य पद्धतीने करण्याचे आदेश नगर विकास विभागाने पारित केले आहेत. त्यामुळे आता सोलापूर महापालिकेची निवडणूक चार सदस्य पद्धतीने होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
  • दिनांक सहा मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने महापालिका निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. त्या संदर्भात एका महिन्याच्या आत त्याचा तपशील देण्यास सांगितले होते. त्यानुसार आता नगररचना विभागाने ड वर्गातील सर्व महापालिका चार सदस्य पद्धतीने होतील आणि त्याबाबत लवकरात लवकर प्रभाग रचना करा, असे आदेश काढले आहेत. त्याचे पत्र नुकतेच महापालिकेला प्राप्त झाले आहे. सोलापूर महापालिका विभागात येत असल्यामुळे या महापालिकेची निवडणूक आता चार सदस्य पद्धतीने म्हणजेच 2017 प्रमाणे होणार आहे.
Share This Article