महाराष्ट्र

ब्रेकिंग! राज्यातील मद्यप्रेमींना दणका

  • राज्यातील मद्यप्रेमींसाठी एक बातमी समोर आली आहे. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली, ज्यात राज्याच्या महसुलात वाढ करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्यावरील शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • या निर्णयामुळे भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावर दीड टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे, ज्यामुळे मद्याचे दर वाढणार आहेत. शुल्कातील या वाढीमुळे राज्याच्या तिजोरीत तब्बल १४ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल वाढणार आहे, अशी अपेक्षा आहे.
  • यासोबतच राज्य सरकारने आता सीलबंद विदेशी मद्य विक्रीसाठी हॉटेल आणि रेस्टॉरंट्सना कराराद्वारे भाडेतत्त्वावर चालविण्यास मान्यता दिली आहे. यावर १० ते १५ टक्के अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार आहे, ज्यामुळे यातूनही आणखी महसूल वाढणार आहे. हा निर्णय राज्याच्या महसुलात वाढ करण्यासाठी आणि मद्य विक्रीचे नियमन करण्यासाठी घेण्यात आला आहे.

Related Articles

Back to top button