देश - विदेश

ब्रेकिंग! नितीन गडकरी पुन्हा चर्चेत, म्हणाले…

विदेशात चॉकलेट खाल्ल्यावर वेष्टन खिशात ठेवतात. तर भारतात रस्त्यावर फेकण्याची सवय आहे. हे चित्र बदलले पाहिजे त्यासाठी पान, तंबाखू, गुटखा खाऊन रस्त्यावर थुंकणाऱ्यांचे पोटो पेपरमध्ये छापावेत, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

गांधी जयंतीनिमित्त आज नागपूर महापालिकेकडून आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी उपस्थित होते.
गडकरी म्हणाले की, मलादेखील चॉकलेट खाल्ल्यावर गाडीतून वेष्टन रस्त्यावर फेकण्याची सवय होती. पण, नंतर ही सवय प्रयत्नपूर्वक बदलली. आता मी वेष्टन खिशात ठेवतो आणि घरी गेल्यावर डस्टबीनमध्ये टाकतो. नेते जगाला मार्गदर्शन करतात. पण व्यक्तिगत जीवनात अनुकरण करीत नाही. मी मात्र असे वागत नाही, असे गडकरींनी सांगितले. इकॉलॉजी, पर्यावरण चांगले असले तर दवाखान्यात जायची वेळ येत नाही. जल, वायू व ध्वनी प्रदुषणामुळे आयुष्य कमी करीत आहो. कचऱ्यातून संपत्ती निर्माण केली तर सर्व समस्या संपेल, असे गडकरींनी सांगितले.

Related Articles

Back to top button