हवामान

ब्रेकिंग! हवामान खात्याची नवी अपडेट

गेल्या पाच-सहा दिवसांपासून पुणे-मुंबईत पोहोचलेल्या मान्सूनची अजूनही प्रगती नाही. खान्देश, नाशिक व विदर्भातील उत्तरेकडील जिल्ह्यांत अजून मान्सून पोहोचलेला नाही.

सध्याचे दहा-बारा दिवस म्हणजे 19 जूनपर्यंत पावसासाठी वातावरण अनुकूल नसले तरी गुरुवारपासून पुढील तीन दिवस म्हणजे शनिवार, 7 जूनपर्यंत नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांत व मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

विदर्भातील 11 जिल्ह्यांत मध्यम पावसाची शक्यता या तीन दिवसांत जाणवते. कोकण, मुंबईसह, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता कायम आहे.

Related Articles

Back to top button