खेळ
चेंगराचेंगरीचे सगळे खापर एकट्या विराटवर फुटले

प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफी जिंकली. आरसीबीच्या विजयानंतर संघ बंगळुरुमध्ये विजय परेडद्वारे हा विजय साजरा करेल, असे वृत्त आधी आले होते. परंतु शहराच्या वाहतूक कोंडीचा हवाला देत पोलिसांनी विजयी परेडला परवानगी दिली नव्हती. त्यातच यानंतर संघाच्या विजयी जल्लोषात झालेल्या दुर्घटनेत 11 लोकांना आपला जीव गमवावा लागला.
या दुर्दैवी घटनेनंतर विराट कोहलीने एक भावनिक प्रतिक्रिया देत म्हटले, माझं मन मोडलंय. मी निशब्द झालोय.
दरम्यान बीसीसीआय आणि आयपीएल प्रशासनाने या संपूर्ण घटनेपासून स्वत:ला अलिप्त ठेवले असून हात झटकले आहेत. काल बंगळुरुतील पोलीस दल व इव्हेंट मॅनेजमेंट यंत्रणा अपयशी ठरल्याचे स्पष्ट असून आले. पण अनेक बड्या अधिकार्यांनी अप्रत्यक्षपणे कोहलीच्या चाहत्यांच्या जबाबदार धरले आहे.



