क्राईम

ब्रेकिंग! माणुसकी मेली, मृतांची संख्या वाढली, स्टेडियम बाहेर चेंगराचेंगरीत दहा जण ठार

  • आयपीएल ट्रॉफीवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आपले नाव कोरले आहे. याच संघाच्या सत्कारासाठी बंगळुरूमध्ये आज एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चिन्नास्वामी स्टेडियमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला मात्र गालबोट लागले आहे. या स्टेडियमच्या परिसरात मोठी चेंगराचेंगरी झाली असून तब्बल दहा जणांचा मृत्यू झाला आहे. 
  • मिळालेल्या माहितीनुसार या स्टेडियममध्ये एका वेळी 40 हजार प्रेक्षक बसू शकतात. पण प्रत्यक्षात मात्र या कार्यक्रमाला तब्बल पाच लाख लोक जमा झाले होते. याचाच अंदाज आयोजकांना आला नसल्याचा आरोप आता केला जात आहे. 
  • दरम्यान बंगळुरु स्टेडियममध्ये बाहेर चाहते चेंगराचेंगरी होऊन गुदमरत असताना आत मात्र विजयी खेळाडूंचा सत्कार होत होता असे विचित्र दृश्य माणूसकीलाही लाजवणारे होते. रॉयल चॅलेंजर्स बंगलुरुच्या विजयानंतर बाहेर मातम सुरु असताना आत खेळाडू राज्य सरकारकडून हार तुरे स्वीकारत असल्याचा प्रकार पाहून यावर आता कठोर टीका होत आहे.

Related Articles

Back to top button