सोलापूर

ब्रेकिंग! बहीण ऑस्ट्रेलियात, भावाने केला भयानक कांड

  • सोलापुरात धक्कादायक घटना घडली आहे. येथे शेत जमिनीसाठी पोटच्या मुलानेच बायकोच्या मदतीने जन्मदात्या आईचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लक्ष्मी महाडिक (62 वर्षे) असे मयत आईचे नाव आहे.
  • शुक्रवार रोजी रात्री 9.30 वाजता माढ्यातील मुंगशी येथे ही घटना घडली आहे.
  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतीसाठी आईचा खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. लक्ष्मी यांचा मुलगा दत्तात्रय महाडिक व सून रजनी महाडिक तसेच व्याही धर्मराज बागल या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
  • पुढे आलेल्या माहितीनुसार, मृत महिला लक्ष्मी यांची 8 एकर शेतजमीन आहे. लक्ष्मी यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. 10 महिन्यापूर्वीच त्यांच्या पतीचे निधन झाले. त्यांची मुलगी विवाहित असून ती ऑस्ट्रेलिया येथे राहण्यास आहे. येथे लक्ष्मी या मुलगा आणि सुनेशी भांडण होत असल्याने व पटत नसल्याने त्या वेगळ्या राहत होत्या. मुलाशी आणि सुनेशी आईचे शेतीसाठी वारंवार वाद होत होते. सदर महिलेला सहा महिन्यांपूर्वी देखील महिलेचा मुलगा, सून आणि सुनेच्या वडिलांकडून ऊसाच्या शेतात मारहाण करण्यात आली होती. 
  • दिलेल्या फिर्यादीनुसार, लक्ष्मी महाडिक यांची मुलगी कल्पना ऑस्ट्रेलियात राहते. तिने आतेभावाला फोन करून माझ्या आईला शेतात मारून टाकले आहे. तू तेथे जाऊन बघ. त्यानंतर उसाच्या शेतामध्ये जाऊन पाहिले असता उसाच्या सरीमध्ये लक्ष्मी महाडिक या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. मृत महिलेचा गळा कपड्याने आवळलेला होता. तोंडावर व डोक्यात दगडाने मारल्याच्या खुणा होत्या.
  • याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Related Articles

Back to top button