देश - विदेश

एकच नंबर! बलुच आर्मीचा पुन्हा नवा धमाका

  • सध्या पाकिस्तानमध्ये अंतर्गत संघर्ष सुरु आहे. पाकिस्तानमध्ये बलुच लिबरेशन आर्मी आणि लष्करी सैन्यात संघर्ष सुरु आहे. बलुच आर्मीने स्वातंत्र्याची मागणी केली आहे. 
  • तसेच पाकिस्तानवर पूर्ण नियंत्रण मिळवण्याची तयारी देखील बलुच आर्मीने केली आहे. याअंतर्गत बलुच आर्मीची पाकिस्तानमध्ये कारवाई देखील सुरु आहे.
  • नुकतेच बलुच आर्मीच्या स्पेशल टॅक्टिकल ऑपरेशन्स स्क्वॉडने क्वेटामध्ये मोठी ल्ष्करी कारवाई केली आहे. या कारवाई दरम्यान पाकिस्तानी लष्कराचा प्रमुख एजंट बाबुल मुहम्मद हसनी याला ठार मारले असल्याचे बीएलएने म्हटले आहे. बीएलएच्या गुप्तचर विभाग झिराबने याची माहिती दिली.
  • बीएलएच्या आर्मीने क्वेटामधील बरुरू रोडवर एका थांब्यावर पाकिस्तानी लष्कराचा एजंट मुहम्मद हसनीच्या वाहनाला लक्ष्य केले. मुहम्मदच्या वाहनावर बॉम्ब हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात हसनीचा जागीच मृत्यू झाला तर त्याचे साथीदार गंभीर जखमी झाल्याचे बीएलएने म्हटले आहे. दरम्यान हसनी हा पाकिस्तानी लष्कर आणि पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचा प्रमुख एजंट होता. 

Related Articles

Back to top button