महाराष्ट्र
ब्रेकिंग! राज्य सरकारचा मोठा निर्णय

- राज्य सरकारच्या प्राथमिक शिक्षण विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता शाळेत इयत्ता पहिलीपासूनच विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी घोषणा शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केली आहे.
- नाशिकच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. लहानपणापासूनच मुलांमध्ये राष्ट्रभावना वाढीस लागावी, यासाठी सरकारचा प्रस्ताव आहे. पहिल्या इयत्तेपासून विद्यार्थ्यांना सेवानिवृत्त सैनिक, क्रीडा शिक्षक, एनसीसी आणि स्काउट गाईडचे टीचर प्राथमिक सैनिकी प्रशिक्षण देणार आहेत, अशी माहिती भुसेंनी दिली आहे.
- जिल्हा परिषदेच्या ४८ शिक्षकांना अलिकडेच सिंगापूरला अभ्यास दौऱ्यासाठी पाठवण्यात आले होते. तेथील शिक्षण व्यवस्थेतमध्ये ‘राष्ट्र प्रथम’ ही संकल्पना असल्याचे शिक्षकांनी सांगितले. महाराष्ट्रातही शालेय शिक्षणात आमूलाग्र बदल केले जात आहेत. शिक्षणातून देशभक्तीची भावना निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून शालेय शिक्षणात बदल दिसून येतील. यात पहिलीपासून सैनिकी शिक्षण देण्याचा मानस आहे, असे ते म्हणाले.



