खेळ

बघा पटतंय का! यंदाची आयपीएल कोण जिंकणार?

  • मुंबई इंडियन्सला क्वालिफायर 2 मध्ये पराभूत करून काल पंजाब किंग्सने फायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. आयपीएलच्या फायनलमध्ये पंजाबचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे. पंजाब किंग्स फायनलमध्ये पोहोचताच ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने केलेली एक भविष्यवाणी चर्चेचा विषय बनली आहे. क्लार्कने अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या दोन संभाव्य टीमची नावे आधीच जाहीर केली होती. त्याने म्हटले होते की, आयपीएलच्या अंतिम फेरीत बंगळुरू आणि मुंबई या दोन संघांमध्ये सामना होण्याची शक्यता आहे. त्याची अर्धी भविष्यवाणी खरी ठरली असून आरसीबीने अंतिम फेरी गाठली आहे, मात्र मुंबई इंडियन्स संघ फायनलमध्ये धडक मारू शकला नाही. क्लार्कने आयपीएल फायनल कोण जिंकेल याबाबतही भविष्यवाणी केली होती, मात्र मुंबईचा संघ फायनलमध्ये न पोहोचल्याने क्लार्कने वर्तवलेल्या भाकितावर उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
  • क्लार्कने आता म्हटले आहे, आरसीबी हा एक असा संघ आहे ज्यावर सर्वाधिक विश्वास ठेवला जाऊ शकतो. आरसीबीच्या संघात X फॅक्टर अधिक दिसून येत आहेत. म्हणजेच या संघाची जिंकण्याची संधी अधिक प्रबळ आहे. अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्ससारख्या प्रबळ संघाचे आव्हान नसल्याने आरसीबीची जिंकण्याची संधी अधिक वाढली आहे. अंतिम फेरीत मुंबईचा संघ नसल्याने आरसीबी फायनल जिंकू शकते.

Related Articles

Back to top button