सोलापूर

मोठ्या घरची राणी मात्र, बदनाम केलं मला हगवणेंनी…

  • सध्या वैष्णवी हगवणे आत्महत्या आणि हुंडाबळी प्रकरण प्रचंड चर्चेत आहे. राष्ट्रवादीचे माजी पदाधिकारी असलेल्या राजेंद्र हगवणे आणि त्यांच्या मुलांनी वैष्णवीचा छळ केल्याचे समोर आले होते. तसेच लग्नामध्ये हुंडा म्हणून फॉर्च्युनरही घेतली होती. या प्रकरणानंतर हुंड्यात मिळालेली गाडी घेऊन रुबाब दाखवणारे म्हणत हगवणे कुटुंबावर प्रचंड टीका होत आहे. अशातच सोलापूरमधील एका फॉर्च्युनर मालकाने हगवणे प्रकरणानंतर आपल्या गाडीवर लिहलेल्या मजकुराने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
  • करमाळा येथील अतुल खुपसे यांनी आपल्या फॉर्च्युनर गाडीवर रोखीत विकत घेतलेली माझी घरची राणी, अशा आशयाचा मजकूर लिहिला आहे.
  • खुपसे यांच्या फॉर्च्युनर गाडीवरील मजकूर सध्या सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंडिंग होत आहे. तशी तर मी मोठ्या घरची राणी, मात्र मला बदनाम केलं हगवणे यांनी. मी फॉर्च्युनर. माझा रुबाबच वेगळा, हगवणे कुटुंबामुळे नाव ठेवू लागलाय गाव सगळा, अतुलभाऊंनी मला रोखीत विकत घेतलंय, पण हगवणेमुळे फॉर्च्युनर जातीला लोकांनी धु धु धुतलंय, असा मजकूर या गाडीवर लिहिण्यात आला आहे.
  • दरम्यान सर्वसामान्यांना, शेतकऱ्यांना फॉर्च्युनर गाडी घ्यायची तर दोन तीन वर्ष पैसे जमा करायचे किंवा बँकेचे लोन काढावे लागते. एवढी चांगली हगवणे कुटुंबामुळे बदनामी झाली. मी कुठेही गेलो, हॉटेलवर जेवायला थांबलो तरी लोक विचारतात, तुमची आहे का सासऱ्यांनी दिली? त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबात मुली दिल्या तर अशी प्रकरणे होणार नाहीत, असे खुपसे यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button