खेळ

मुंबई जिंकली असती पण कोणामुळे हरली?

आयपीएलच्या क्वालिफायर 2 सामन्यात पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्समध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना खेळण्यात आला. या सामन्यात पंजाबने विजय मिळवत फायनलमध्ये त्यांचे स्थान निश्चित केले. तसेच या पराभवानंतर मुंबईचा या हंगामातील प्रवास इथेच संपला आहे. पंजाबचा अंतिम सामना आरसीबी सोबत उद्या रोजी होणार आहे. पंजाबकडून झालेल्या पराभवानंतर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खूप निराश दिसून आला. याशिवाय हार्दिकने पराभवाचे कारण देखील स्पष्ट सांगितले आहे.

महत्त्वाच्या सामन्यात पराभव मिळाल्यानंतर पांड्याने म्हटले आहे की, श्रेयसने ज्याप्रकारे फलंदाजी केली, ज्याप्रकारे त्याने शॉट्स खेळले ते खूप चांगले होते. मला वाटते की, त्याने खूप छान फलंदाजी केली. हा सामना बरोबरीचा झाला, पण गोलंदाजीच्या दृष्टीने चांगले प्रदर्शन करणे गरजेचे होते. मला वाटते की, मोठ्या सामन्यांमध्ये हे नक्कीच महत्त्वाचे ठरते. श्रेयस शांत होता, त्याने आम्हाला दबावात ठेवले आणि मला वाटते ज्याप्रकारे आम्हाला प्रदर्शन करायचे होते, त्या प्रकारे आम्ही करू शकलो नाही.

हार्दिक पुढे म्हणाला, योग्य गोलंदाजाकडून योग्य प्रकारे गोलंदाजी केली असती तर कदाचित निर्णय वेगळा असता. मागे वळून पाहिले तर काही गोष्टी आमच्या बाजूने असत्या. जसप्रीत बुमराहला परिस्थितीचा अंदाज होता. जर 18 चेंडू उरले आहेत आणि जसप्रीत-जसप्रीत चाहते म्हणत आहेत, तर तो काहीतरी खास करू शकतो. पण आज असे झाले नाही.

या सामन्यात पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयसने शानदार खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात श्रेयसने 41 चेंडूत 87 धावा केल्या. ज्यामध्ये 5 चौकार आणि 8 षटकार सामील होते. ज्यामुळे त्याला सामनावीर पुरस्कार देखील देण्यात आला.

Related Articles

Back to top button