खेळ

हार्दिक कोसळला, रोहित निराश, नीता अंबानींनी डोक्याला लावला हात

  • आयपीएलच्या क्वालिफायर 2 सामन्यात पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्समध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना खेळण्यात आला. या सामन्यात पंजाबने विजय मिळवत फायनलमध्ये त्यांचे स्थान निश्चित केले. तसेच या पराभवानंतर मुंबईचा या हंगामातील प्रवास इथेच संपला आहे. पंजाबचा अंतिम सामना आरसीबी सोबत उद्या रोजी होणार आहे. पंजाबकडून झालेल्या पराभवानंतर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खूप निराश दिसून आला. मुंबईच्या पराभवाचा धक्का हार्दिकला असह्य झाला. त्यामुळे हार्दिक मैदानात भावूक झाला. आपल्या नेतृत्वात मुंबईला अंतिम फेरीत पोहचवू न शकल्याचे शल्य त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते. तर दुसऱ्या बाजूला रोहित शर्मा याचाही चेहरा पडला होता.
  • या पराभवामुळे हार्दिक नाखूश दिसत होता. तर मुंबईच्या गोटातही निराशेचे वातावरण होते. आपण जिंकू शकलो नाहीत, याचे दु:ख खेळाडूंच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होते. तसेच मुंबई इंडियन्सच्या मालकीण निता अंबानी या देखील हताश दिसल्या. तसेच या पराभवामुळे मुंबई इंडियन्सचे चाहते हळहळले.

Related Articles

Back to top button