- अलीकडे देशात सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाल्याचे पहावयास मिळत आहे. यामुळे सोने खरेदी करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. दरम्यान, सोन्याच्या किमतीत या आठवड्यात थोडीशी घसरण झाली आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर सुमारे 770 रुपयांनी घसरला आहे, ज्यामुळे दिल्लीत त्याची किंमत आता प्रति दहा ग्रॅम 97,460 रुपये झाली आहे. त्याचवेळी 22 कॅरेट सोन्याचा दर 700 रुपयांनी कमी होऊन 89,350 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे. देशातील इतर प्रमुख शहरांमध्येही असाच ट्रेंड दिसून आला आहे.
- सध्या देशातील सर्व शहरांमध्ये 24 कॅरेट सोने प्रति दहा ग्रॅम 97 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. दुसरीकडे जर आपण दागिने खरेदी करणाऱ्यांबद्दल बोललो तर 22 कॅरेट सोने प्रति दहा ग्रॅम 89 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. दिल्लीत 22 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 89,350 रुपये आहे. त्याचवेळी 24 कॅरेट सोने 97,460 आहे.
- मुंबईमध्ये आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ९,७३१ रुपये प्रति ग्रॅम, २२ कॅरेट सोन्याचा भाव ८,९२० रुपये प्रति ग्रॅम आणि १८ कॅरेट सोन्याचा भाव ७,२९९ रुपये प्रति ग्रॅम आहे.
आठवडाभरात सोने किती स्वस्त झाले?
