राजकीय

शरद पवारांचा राज ठाकरेंना दणका

  • राज्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही. मात्र, त्याआधीच फोडाफोडीच्या राजकारणाने वेग घेतला आहे. सध्याच्या परिस्थितीत महायुतीत इनकमिंग वाढली आहे. परंतु, आज पुण्यात वेगळीच घडामोड घडली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शंभर कार्यकर्त्यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला. या कार्यकर्त्यांनी महायुती नाही तर चक्क महाविकास आघाडीतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने ही लक्षवेधी घटना आज घडली.
  • मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज मोदीबागेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. चार महिन्यात पुणे महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यादृष्टीने या पक्षप्रवेशाला महत्व प्राप्त झाले आहे. यामुळे शरद पवार गटाची ताकद वाढली आहे तर दुसरीकडे ऐन निवडणुकीच्या तोंडावर मनसेला खिंडार पडले आहे. पक्षबांधणीसाठी नव्याने प्रयत्न करणाऱ्या राज ठाकरेंसाठी हा धक्का मानला जात आहे.
  • पुण्यातील मनसेचे प्रमुख नेते रोहन गायकवाड यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. आजमितीस पुण्यात मनसेचा एकही आमदार नाही. येथील स्थानिक नेते वसंत मोरे यांनीही काही दिवसांपूर्वी मनसेला जय महाराष्ट्र केला होता. त्यामुळे आता पुण्यात मनसेची अवस्था अतिशय दुबळी झाली आहे. अशा परिस्थितीत पक्षाला महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांना सामोरे जायचे आहे. नगरसेवक निवडून आणण्याचे मोठे आव्हान मनसेसमोर उभे ठाकले आहे.

Related Articles

Back to top button