ब्रेकिंग! अजितदादा गटात राजकीय भूकंप

Admin
1 Min Read
  • महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सर्वात मोठा धक्का बसला आहे. अजितदादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सात आमदारांनी पक्षाला रामराम ठोकत सत्ताधारी नॅशनल डोमोक्रॅटीक प्रोगेसिव्ह पार्टीत प्रवेश करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. ही सर्व उलथापालथ नागालँडच्या राजकारणात झाली असून अजितदादा यांच्या राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
  • नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) सर्व सात आमदार सत्ताधारी पक्ष नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (एनडीपीपी) मध्ये सामील झाले आहेत. या विलीनीकरणामुळे मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांच्या नेतृत्वाखालील एनडीपीपीला 60 सदस्यांच्या विधानसभेत पूर्ण बहुमत मिळाले आहे, ज्यामुळे त्यांची संख्या 25 वरून 32 झाली आहे. नागालँड विधानसभेत एकूण 60 जागा आहेत, म्हणजेच आता एकट्या एनडीपीपीकडे बहुमत आहे.
  • राष्ट्रवादीमधील फूटीनंतर नागालँडमधील आमदारांनी अजितदादा यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. 2023 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष भाजपने 12 जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीत राष्ट्रवादी राज्यातील तिसरा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला होता. तसेच अजितदादा यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी हा राज्यातील मुख्य आणि सर्वात मोठा विरोधी पक्ष होता. मात्र आता या सर्व आमदारांनी सत्ताधारी पक्षामध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला आहे.
Share This Article