- पुण्यातील मध्यवर्ती भागात आज एक मोठी घटना घडली आहे. एका कारने बारा विद्यार्थ्यांना धडक दिली आहे. हे विद्यार्थी एमपीएससीचे असल्याची माहिती मिळत आहे. बारा विद्यार्थी चहा पित असताना ही घटना घडली आहे. यातील 9 विद्यार्थी जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे.
- या सगळ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुण्यातील सदाशिव पेठ परिसरात मध्यवर्ती भागात एमपीएससीची विद्यार्थी राहतात. सायंकाळच्या सुमास हे विद्यार्थी चहा पिण्यासाठी बाहेर आले होते. सर्वा विद्यार्थी भावे हायस्कूलजवळ असलेल्या एका टपरीवर हे विद्यार्थी चहा पित होते. यावेळी एका कारने चहा पित असलेल्या विद्यार्थ्यांना धडक दिली. या अपघातात 9 विद्यार्थी जखमी झाले असून त्यांना संचेती आणि मोडक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यातील त्यातील 7 जणांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडवण्यात आले आहे, तर दोघांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान चालक मद्यधुंद अवस्थेत असून त्या दोघांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ब्रेकिंग! दारू पिऊन कार चालवली, चहा पित असलेल्या एमपीएससीच्या 12 विद्यार्थ्यांना उडवले
