क्राईम

काळी जादू, बॉलिवूड स्वप्न आणि विवाहबाह्य संबंध

  • उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये मर्चंट नेव्ही अधिकारी सौरभ राजपूत याच्या हत्येने देशभरात खळबळ उडाली आहे. सौरभची पत्नी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला यांनी मिळून त्याची हत्या करून मृतदेहाचे १५ तुकडे केले आणि सिमेंटने भरलेल्या ड्रममध्ये पुरले.
  • या प्रकरणात काळी जादू, बॉलिवूड स्वप्न आणि विवाहबाह्य संबंधांचा गुंता उलगडत असून, पोलिसांनी धक्कादायक खुलासे केले आहेत. मुस्कान आणि साहिल यांना अटक झाली असून तपासात रोज नवे खुलासे समोर येत आहेत.
  • सौरभ राजपूत (वय २९) हा लंडनमध्ये काम करत होता आणि २४ फेब्रुवारी २०२५ रोजी आपल्या मुलीच्या वाढदिवसासाठी मेरठला परतला. मात्र, ४ मार्च रोजी त्याची पत्नी मुस्कान (वय २७) आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला (वय २५) यांनी त्याला नशेच्या गोळ्या देऊन बेशुद्ध केले आणि चाकूने वार करून ठार मारले. त्यानंतर त्यांनी सौरभचा मृतदेह १५ तुकड्यांत कापला, सिमेंटने भरलेल्या प्लास्टिक ड्रममध्ये सील केला आणि हिमाचल प्रदेशात पळून गेले. मेरठ शहराचे एसपी आयुष विक्रम सिंह यांनी सांगितले की, ही हत्या सुनियोजित होती आणि दोघांनी गुन्हा कबूल केला आहे.
  • १८ मार्च रोजी सौरभचा भाऊ बबलू याने त्याला बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. मुस्कानच्या संशयास्पद वागण्यामुळे पोलिसांनी तिला आणि साहिलला ताब्यात घेतले. घरमालकाने घर रिकामे करण्यासाठी कामगार पाठवले असता, ड्रममधून दुर्गंध आल्याने संशय बळावला. कामगारांनी पोलिसांना कळवले आणि तपासात ड्रममधून सौरभचा मृतदेह सापडला. पोस्टमॉर्टम अहवालानुसार, सौरभच्या हृदयावर तीन वेळा वार करण्यात आले, त्यानंतर त्याचे तुकडे करण्यात आले. हत्येसाठी वापरलेले चाकू आणि ड्रम पोलिसांनी जप्त केले आहे.
  • मुस्कान आणि सौरभ यांचा २०१६ मध्ये प्रेमविवाह झाला होता, पण २०१९ पासून मुस्कानचे साहिलशी संबंध होते. २०२१ मध्ये सौरभला याची माहिती मिळाली आणि त्याने घटस्फोटासाठी अर्ज केला होता, पण कुटुंबाच्या दबावामुळे तो मागे हटला. सौरभच्या भावाने दावा केला की, मुस्कान बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी घर सोडून पळाली होती आणि सौरभच्या पैशातून तिने मालमत्ता आणि आयफोन खरेदी केला होता. पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे की, प्रेमसंबंध आणि आर्थिक कारणांमुळे ही हत्या झाली.
  • या प्रकरणात काळ्या जादूचा संशयही व्यक्त होत आहे. साहिलच्या घरात भिंतींवर तांत्रिक चिन्हे, शिवाचे चित्र आणि लाल-काळ्या रंगात लिहिलेली वाक्ये सापडली आहेत. पोलिसांना आढळले की, मुस्कानने साहिलला सांगितले होते की, ती त्याच्या मृत आईशी बोलते आणि तिने सौरभला मारण्याचे आदेश दिले आहेत. मुस्कानने स्नॅपचॅटवर बनावट खाते तयार करून साहिलची मनिपुलेशन केली. साहिलने सौरभचे डोके आणि हात आपल्या घरी ठेवले होते, जिथे त्याने कथितपणे तांत्रिक विधी केले. मात्र, पोलिसांनी काळ्या जादूचा ठोस पुरावा नसल्याचे म्हटले आहे. 

Related Articles

Back to top button