ब्रेकिंग! मुंबईत सकाळीच अंधार, ढगांचा प्रचंड गडगडाट

Admin
1 Min Read
  • राज्यात मे महिन्यातच पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. त्याचप्रमाणे मुंबईसह उपनगरांमध्येही आज पहाटेपासूनच पावसाचा जोर दिसून येत आहे. अद्याप जूनचा पहिला आठवडाही आलेला नसतानाच पावसाने सर्वत्र लवकर हजेरी लावल्याने नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली आहे. मुंबईत आज पहाटेपासून पडणाऱ्या पावसाचा परिणाम रेल्वे सेवेवरही दिसून येत असून मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशीराने सुरू आहे. हिंदमाता, दादर, परळ परिसरातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
  • आज पहाटेपासून ढग दाटून आल्याने काळोखलेले वातावरण असून मुंबईकरांना अद्याप सूर्याचे दर्शन झालेले नाही. संपूर्ण मुंबईत ढगाळ वातावरण असून शहरांसह उपनगरांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील दोन तास मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढील काही तासांत जिल्ह्यांतील काही ठिकाणी ५०-६० किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
  • सध्याची परिस्थिती पाहता मुंबईच्या उपनगरांमध्ये पावसाचा जोर सुरू आहे. काळे ढग आणि मुसळधार पावसामुळे काही वेळातच जलभरतीची शक्यता नाकारता येत नाही.
Share This Article