महाराष्ट्र
राज्यात आज-उद्या जोरदार पाऊस होणार

- मान्सूनने कोकणातील देवगडमध्ये हजेरी लावली. या आनंदवार्तेने महाराष्ट्राला दिलसा मिळाला आहे. यातच मान्सून आणि मान्सूनपुर्व पावसाची सरमिसळ झाली असून हवामान विभागाने 31 मेपर्यंत पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज व्यक्त केला आहे. दरम्यान आज आणि उद्या २७ मे रोजी राज्यात जोरदार पावसाची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
- मध्य महाराष्ट्रात आज बऱ्याच ठिकाणी तर उद्या २७ मे रोजी काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यानंतर ३१ मेपर्यंत पावसाची सर मध्य महाराष्ट्रात राहील.
- मराठवाड्यात आज बऱ्याच ठिकाणी तर उद्या काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.



