ब्रेकिंग! मुसळधार पावसामुळे मोदींचा पुणे दौरा रद्द

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा नियोजित पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर हा दौरा रद्द करण्यात आला आहे. मोदींच्या हस्ते आज शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मार्गाचे तसेच सोलापूर विमानतळाचे 26 सप्टेंबर रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केले जाणार होते. त्यानंतर स.प. महाविद्यालयावर जाहीर सभा होणार होती. मोदींचा पुणे दौरा तात्पुरता रद्द करण्यात आला असून त्याची नवीन तारीख लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
या नियोजित दौऱ्यात मोदींचे पुणे विमानतळावर आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास आगमन होणार होते. त्यानंतर ते शिवाजीनगर स्थानकावर येऊन मेट्रोने शिवाजीनगर ते स्वारगेट असा प्रवास करणार होते. भुयारी मार्गाचे लोकार्पण केल्यानंतर मोदी हे वाहनाने स.प महाविद्यालयाच्या मैदानावर दाखल होणार होते. येथे मोदींची जाहीर सभा पार पडणार होती.
मोदींच्या आजच्या दौऱ्यात मेट्रोसह एकूण 12 प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन होणार होते. मात्र पुणे शहर आणि परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे मोदी यांचा आजचा दौरा रद्द करण्यात आला आहे.



