- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिकानेरमध्ये पाकिस्तानला उघड इशारा दिला. त्यांनी ऑपरेशन सिंदूरच्या तत्वांचा उल्लेख केला. यामध्ये त्यांनी म्हटले की, भारतावर दहशतवादी हल्ला झाल्यास योग्य उत्तर दिले जाईल. भारत अणुबॉम्बच्या धमकीने घाबरणार नसल्याचे देखील मोदींनी स्पष्टपणे जाहीर सभेत सांगितले.
- मोदी यांनी राजस्थानमधील बिकानेर येथे ऑपरेशन सिंदूरचे यश सांगत पाकिस्तानला खुले आव्हान दिले. ऑपरेशन सिंदूरने दहशतवादाचा सामना करण्यासाठी तीन तत्वे निश्चित केली आहेत. यापैकी पहिला इशारा म्हणजे भारतावर दहशतवादी हल्ला झाल्यास भारत गप्प बसणार नाही. त्याला योग्य उत्तर मिळेल. हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची वेळ आणि पद्धत आपल्या सैन्याने ठरवली पाहिजे, असे मोदींनी म्हटले.
- दुसरे तत्व म्हणजे – भारत अणुबॉम्बच्या धमकीने घाबरणार नाही. मोदी की नसों में गर्म सिंदूर बह रहा है. ऑपरेशन सिंदूरच्या तिसऱ्या तत्वात मोदींनी दहशतवादाविरुद्ध पाकिस्तानला उघड इशारा दिला. त्यांनी भारताची भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. तिसरे तत्व म्हणजे आपण दहशतवादाचे सूत्रधार आणि दहशतवादाला आश्रय देणारे सरकार यांना वेगळे पाहणार नाही, तर आपण त्यांना एक मानू. पाकिस्तानच्या राज्य आणि राज्याबाहेरील घटकांचा हा खेळ आता चालणार नाही.
ब्रेकिंग! मोदी की नसों में गर्म सिंदूर बह रहा है
