- केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काही दिवसांपूर्वी एक महत्त्वपूर्ण विधान करत ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि ‘चांद्रयान’ मोहिमा शालेय अभ्यासक्रमाचा भाग होऊ शकतात, असे सूचित केले होते. या घोषणेनंतर उत्तराखंड सरकारने या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्यातील नोंदणीकृत मदरशांमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ या विषयाचा समावेश शैक्षणिक अभ्यासक्रमात करण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
- उत्तराखंडमध्ये सध्या ४५१ नोंदणीकृत मदरसे कार्यरत आहेत, जिथे सुमारे ५०,००० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना ‘ऑपरेशन सिंदूर’सारख्या लष्करी मोहिमेबद्दल माहिती देण्यात येणार असून त्यातून त्यांच्यात देशभक्ती, राष्ट्रीय सुरक्षेविषयी जागरूकता आणि भारतीय लष्कराच्या पराक्रमाबद्दल अभिमान निर्माण होईल, असा विश्वास राज्य सरकारने व्यक्त केला आहे.
- ‘ऑपरेशन सिंदूर’ ही एक सर्जिकल स्ट्राईक होती, ज्याद्वारे भारताने पाकिस्तानच्या भूमीवर घुसून दहशतवाद्यांवर हल्ला केला होता. या मोहिमेमुळे देशभरात राष्ट्रभक्तीची भावना जागृत झाली होती. ही घटना केवळ लष्करी दृष्टिकोनातूनच नव्हे, तर देशाच्या आत्मविश्वासाचा आणि सामर्थ्याचा प्रतीक ठरली. अशा महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांची माहिती विद्यार्थ्यांना शालेय पातळीवर मिळाल्यास त्यांना आपल्या देशाच्या सुरक्षा व्यवस्थेची आणि लष्कराच्या कर्तृत्वाची जाणीव होईल.
- आजची तरुण पिढी सोशल मिडियावर जागतिक घडामोडी पाहते, पण भारताच्या शौर्यगाथांबद्दल त्यांना फारशी माहिती नसते. अभ्यासक्रमात ब्रह्मोस, आकाश, तेजस, आणि अग्नि मिसाईल यांसारख्या भारतीय संरक्षण तंत्रज्ञानाचा उल्लेख केल्यास त्यांच्या मनात कुतूहल निर्माण होईल आणि त्यांना या क्षेत्राकडे वळण्याची प्रेरणा मिळेल.
ब्रेकिंग! ‘ऑपरेशन सिंदूर’ आता मदरशांमध्ये शिकवले जाणार
