- 2006 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपुरातील मुख्यालयावर बॉम्बस्फोट हल्ल्याचा कट रचणाऱ्या दहशतवादी अबू सैफुल्लाहचा पाकिस्तानात खात्मा करण्यात आला आहे. काही अज्ञातांनी त्याच्यावर गोळ्या झाडत त्याला ठार मारण्यात आल्याचे समोर आले आहे.
- भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावानंतर दहशतवादी सैफुल्लाहला पाकिस्तानाकडून संरक्षण देण्यात आले होते. पण हे संरक्षण भेदत त्याचा खात्मा केला आहे. पाकिस्तानातील सिंधमध्ये ही घटना घडली आहे. संरक्षण असतानाही त्याची हत्या झाल्याने पाकिस्तानात दहशतवाद्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
- ऑपरेशन सिंदूरमुळे आधीच घाबरलेल्या पाकिस्तानला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. लष्कर-ए-तैयबा आणि जमातचा दहशतवादी राजुल्ला निजामानी उर्फ अबू सैफुल्ला पाकिस्तानातील सिंधमध्ये ठार करण्यात आले आहे. सिंधमधील मतली फलकारा चौकाजवळ अज्ञात हल्लेखोरांनी सैफुल्लाहची गोळ्या घालून हत्या केली. समोर आलेल्या माहितीनुसार, सैफुल्लाह नेपाळमधील लष्करच्या मॉड्यूलवर काम करत होता. भारतात दहशतवाद्यांची घुसखोरी आणि आर्थिक मदत गोळा करणे यासारखे गंभीर गुन्हे तो करत होता. सैफुल्ला हा लष्करचा ऑपरेशनल कमांडर आझम चीमा उर्फ बाबाजी याचा सहकारी होता.
- 2006 मध्ये नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यात सैफुल्लाहचा सहभाग होता. तसेच काश्मीरमध्येदेखील त्याने दहशतवादी कारवाया केल्या होत्या. सैफुल्लाह 2001 मध्ये रामपूर येथील सीआरपीएफ कॅम्पवरील हल्ल्यात मुख्य आरोपी होता. तसेच आयआयएससी बंगळुरु येथे 2005 मधील हल्ल्याचा देखील तो मास्टरमाईंड होता. अबू सैफुल्लाह याचे पूर्ण नाव मोहम्मद सलीम उर्फ राजूल्लाह निजामनी असे होते. अबू सैफुल्लाहची हत्या नेमकी कोणी केली? याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
भारताचा आणखी एक शत्रू गेला नरकात, लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर अबू सैफुल्लाह ठार
