पाकिस्तानी अण्वस्त्रांबाबत भारताचे मोठे विधान

Admin
1 Min Read
  • भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धविराम झाला असला तरी तणाव अजून निवळलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर आता संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देखील जम्मू काश्मिरात दाखल झाले. येथे त्यांनी सैन्यातील जवानांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी राजनाथ सिंह यांनी पाकिस्ताननाकडील अण्वस्त्रांबाबत मोठे वक्तव्य केले. पाकिस्तानाकडील अणुबॉम्ब आयएईएच्या देखरेखीखाली आणला पाहिजे, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यानंतर पाकिस्तानात नक्कीच खळबळ उडणार आहे.
  • पाकिस्तानकडून कोणतीही कुरापत काढली जाणार नाही या मुद्द्यावर दोन्ही देशांत सहमती झाली आहे. पण जर असं काही घडलं तर मग मात्र त्याचा दूरगामी परिणाम होतील असा इशाराही त्यांनी पाकिस्तानला दिला. मी जगासमोर सांगू इच्छितो की, पाकिस्तानकडील अण्वस्त्रे इंटरनॅशनल 
  • ऑटॉमिक एनर्जी एजन्सीने स्वतःच्या देखरेखीखाली घ्यायला हवीत. आता आम्हाला त्यांच्याकडून होणाऱ्या न्यूक्लिअर ब्लॅकमेलची काहीही चिंता नाही. पाकिस्तानकडून एटमची धमकी देण्यात आली आहे. तर मग अशा बेजबाबदार देशाच्या हातात अण्वस्त्र सुरक्षित आहेत का? असा सवाल राजनाथ सिंह यांनी उपस्थित केला.
Share This Article