क्राईम

आरोपीच्या ‘त्या’ शब्दांवर विश्वास ठेवला अन् तरूणीचा घात झाला

  • पुण्यात थरकाप उडवणारी घटना घडली आहे. एसटी स्टॅडवर उभा असलेल्या शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरूणीवर लैंगिक अत्याचार झाला आहे. पीडित तरूणीला आरोपीने गोड-गोड बोलून आपल्या जाळ्यात ओढले. नंतर बसमध्ये गेल्यावर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे.
  • दत्तात्रय गाडे असे आरोपीचे नाव आहे. आरोपी सराईत गुंड आहे. आरोपीच्या मागावर आठ पथके आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिली आहे. तसेच पाटील यांनी नेमका घटनाक्रम कसा घडला, हेही सांगितले आहे.
  • पाटील म्हणाल्या, पीडित तरूणी पुण्यात नोकरी करते. तरूणी स्वारगेट बस स्थानकातून सकाळी 5.30 ते 5.45 दरम्यान फलटणला जात होती. बसची वाट पाहत असताना आरोपी पीडित तरूणीच्या शेजारी बसल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. पीडित तरूणीच्या शेजारील माणूस उठून गेला. त्यानंतर आरोपी पीडित तरूणीशी बोलला आहे. तिच्याशी गोड-गोड बोलून आधी ओळख करून घेतली. कुठे जातेय ताई, असे आरोपीने पीडितेला विचारले. मला फलटणला जायचे आहे, असे तरूणीने सांगितले. सातारची बस इथे नाही, तिकडे लागली आहे, असे आरोपीने पीडितेला सांगितले.
  • त्यावर पीडित म्हणाली, बस इथे लागत असल्याने मी बसली आहे. आरोपी म्हणाला, बस तिकडे लागली आहे, चल मी तुला घेऊन जातो. सीसीटीव्ही फुटेजमध्ये पीडीत तरूणी आरोपी गेल्याची दिसत आहे. तिथे गेल्यावर, बसमध्ये अंधार आहे, असा प्रश्न तरूणीने केला. त्यावर, ही रात्रीची उशिराची बस असल्याने प्रवाशी झोपलेले आहेत. तू बसमध्ये जाऊन चेक करू शकतेस, असे आरोपीने सांगितले. तरूणी बसमध्ये जाताच आरोपीही गेला आणि बसचा दरवाजा बंद केला. त्यानंतर आरोपीने पीडित तरूणीवर अतिप्रसंग केला आहे, असे पाटील यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button