- दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील टांगीमर्ग येथे चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या एका तरुणाने पळून जाण्याच्या प्रयत्नात नाल्यात उडी मारली. यामध्ये त्याचा बुडून मृत्यू झाला. तरुण पाण्यात उडी मारतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा तरुण दहशतवाद्यांचा साथीदार असल्याचे पोलिसांनी सांगितले. २३ वर्षीय इम्तियाज अहमद मगरे हा अहरबल परिसरातील रहिवासी होता.
- इम्तियाजला शनिवारी टांगीमार्ग परिसरातून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आणि चौकशीदरम्यान त्याने कबूल केले की, त्याने दहशतवाद्यांसाठी जेवण आणि इतर गोष्टींची व्यवस्था केली होती. सुरक्षा दलांच्या म्हणण्यानुसार, चौकशीच्या आधारे त्याला दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणी नेले जात होते. पोलीस आणि सैन्याचे संयुक्त पथक त्याला रविवारी सकाळी दहशतवाद्यांच्या संभाव्य ठावठिकाणाकडे घेऊन जात होते. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि विश्वा नदीत उडी मारली. पण पाण्याच्या प्रवाहात तो वाहून गेला. ही संपूर्ण घटना ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
पहलगामच्या दहशतवाद्यांसाठी जेवण, इतर गोष्टींची व्यवस्था केली
