मोठी बातमी! काळजी करू नका ; तुम्हाला जे हवे, तेच होणार

Admin
1 Min Read
  • पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान विरुद्ध देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच दरम्यान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानला कठोर शब्दांत इशारा दिला आहे. देशाकडे वाईट नजरेने पाहणाऱ्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल. भारतीय सैनिकांच्या साथीने देशाच्या सीमांची सुरक्षा सुनिश्चित करणं ही संरक्षणमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात तुम्हाला जे वाटते तसे निश्चित होईल, असे राजनाथ सिंह म्हणाले. 
  • राजनाथ सिंह पुढे म्हणाले, देशातील लोकांना जसे वाटते त्याच भाषेत पंतप्रधान मोदी शत्रूला उत्तर देतील. मोदींच्या नेतृत्वात तुम्हाला जसे वाटेल तसेच घडणार आहे. आपल्या पंतप्रधानांना तुम्ही चांगल्या प्रकारे जाणता. त्यांच्या कार्यशैलीशी परिचित आहात. जोखीम स्वीकारण्याचे त्यांचे कौशल्यही तुम्हाला माहिती आहे. देशाच्या विरोधात जे असतील त्यांना उत्तर देण्याचे काम ते करतील.
Share This Article