क्राईम

माझ्या मुलीचा नाद सोड, बीडमध्ये अंगावर काटा आणणारी घटना

बीड जिल्हा खुनाच्या घटनेने पुन्हा हादरला आहे. दोन युवकाकडून दिवसाढवळ्या युवकावर कोयत्याने सपासप वार केल्याची घटना आज सकाळी घडली आहे. राजकुमार साहेबराव करडे (वय 30, रा. गवळीपुरा, अंबाजोगाई) या युवकावर दोन युवकांनी पाठीवर कोयता सदृश धारदार हत्याराने गळ्यावर, डोक्यात, पाठीवर सपासप वार करून गंभीर जखमी केले आहे. जखमी युवकावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र अतिरक्तस्त्रावाने अखेर त्याचा मृत्यू झाला.

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांड घटनेने जिल्हा हादरून गेलेला आहे. त्याच बरोबर जिल्ह्यात रोज नवनवीन घटना समोर येत असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.

अंबाजोगाई शहरातील पोखरी रोडवर सारडा नगरी जवळ दोन तरुणांनी करडे या तरुणावर सपासप वार करून त्यास गंभीर जखमी केले. या हल्ल्यात राजकुमार गंभीर जखमी झाला.

करडे हा दोन वर्षापासून शॉर्ट फिल्म बनवत होता. सनई येथील एका युवतीशी त्याचे प्रेम संबंध होते. तो नेहमी सांगायचा माझे तिच्यावर प्रेम असून आम्ही दोघे लग्न करणार आहोत . परंतु जात समजल्याने तिचे वडील लग्नाला विरोध करत आहेत. नेहमी मला माझ्या मुलीचा नाद सोड नाहीतर जिवे मारून टाकू, अशा धमक्या देत असल्याचे राजकुमार याने आईला सांगितले होते. दरम्यान वैजनाथ शिंदे ,वेदांत शिंदे या बाप लेकासह आदिनाथ भांडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Back to top button