महाराष्ट्र

यंदा मुलांची धम्माल!

  • गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असून, या उत्सवासाठी शाळांना किती दिवस सुट्टी मिळणार याबद्दल पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे. यंदा गणेशोत्सव २७ ऑगस्टपासून सुरू होत असून ६ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन होणार आहे.
  • मुंबई आणि कोकणामध्ये गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. येथे राहणारे कोकणवासीय आपल्या गावी जातात. त्यामुळे या भागातील शाळांना नेहमी पाच दिवसांची सुट्टी असते. पण यंदा गौरी-गणपती विसर्जन सात दिवसांनी होत असल्यामुळे मुंबई आणि कोकणातील सरकारी शाळांना सात दिवसांची सुट्टी मिळणार आहे. गौरींचे आगमन ३१ ऑगस्ट रोजी, पूजा एक सप्टेंबरला आणि गौरी-गणपती विसर्जन दोन सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे ज्या घरांमध्ये गौरी येतात, तेथे बाप्पाचे विसर्जन सात दिवसांनी केले जाते, म्हणून सुट्ट्यांमध्ये वाढ झाली आहे.
  • मुंबई आणि कोकण वगळता विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील शाळांना खालीलप्रमाणे सुट्ट्या मिळतील.
  • २७ ऑगस्ट: गणेश चतुर्थी
  • १ सप्टेंबर: गौराई पूजन
  • ५ सप्टेंबर: ईद-ए-मिलाद
  • ६ सप्टेंबर: गणेश विसर्जन
  • ज्या शाळांना शनिवार आणि रविवारची सुट्टी आहे, त्यांना या चार दिवसांच्या सुट्ट्यांमध्ये दोन शनिवार आणि दोन रविवार जोडून एकूण ८ दिवसांची सुट्टी मिळू शकते.

Related Articles

Back to top button