देश - विदेश

पाकिस्तानला 57 मुस्लिम देशांचा पाठिंबा

  • पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. यात २६ जणांचा मृत्यू झाला. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढतच चालला आहे. त्यात भारताकडून पाकिस्तानची विविध बाजूंनी नाकेबंदी करण्यात आली आहे. तसेच हल्ल्याचे प्रत्युत्तर देण्यासाठी भारत तयार असल्याचे वारंवार सांगितले जात आहे. त्यामुळे पाकिस्तानचे धाबे दणाणले असून त्यांनी आता मुस्लिम राष्ट्रांना पाठिंबा मागितला आहे. त्यामुळे आता पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला पाठिंबा देत भारताविरोधात 57 मुस्लिम देश एकवटले आहेत.
  • पहलगाम हल्ल्यानंतर आता 57 देशांची संघटना असलेल्या ओआयसी म्हणजेच ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को ऑपरेशन या संस्थेने पाकिस्तानला पाठिंबा जाहीर केला आहे. या संघटनेला पाकिस्तानने नुकत्याच झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतरच्या भारताच्या कृतींची माहिती दिली.
  • त्यामुळे भारताची भूमिका अशियायी देशांमध्ये शांतता भंग करणारी असल्याचे म्हणत पाकिस्तानने मुस्लिम राष्ट्रांना पाठिंबा मागितला आहे. त्यानंतर ओआयसीच्या राजदूतांनी पाकिस्तान आणि त्यांच्या जनतेला पूर्ण पाठिंबा दिला आहे. 

Related Articles

Back to top button