देश - विदेश
ब्रेकिंग! पाकसोबत पंगा सुरु असताना मोदींचा ‘तो’ दौरा रद्द

- पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकार सध्या पाकिस्तानवर कठोर कारवाई करण्याची तयारी करत आहे. सिंधू जल करार रद्द केल्यानंतर आता पाकिस्तानवर लष्करी कारवाई करण्याची तयारी सरकारकडून करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे एक मोठी बातमी समोर आली आहे.
- या बातमीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रशिया दौरा रद्द झाला आहे. मोदी रशियातील विजय दिनाच्या परेडमध्ये सामील होण्यासाठी रशिया दौऱ्यावर जाणार होते. मात्र आता त्यांचा दौरा रद्द करण्यात आला आहे. जर्मनीवरील विजयाच्या 80 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित समारंभात सहभागी होण्यासाठी मोदी 9 मे रोजी मॉस्कोला जाणार होते.
- रशियामध्ये दरवर्षी दुसऱ्या महायुद्धात सोव्हिएत युनियनने नाझी जर्मनीवर मिळवलेल्या विजयाच्या वर्धापन दिनानिमित्त विजय दिन परेड आयोजित करण्यात येते. या परेडमध्ये रशिया आपली ताकद जगाला दाखवते. 2025 च्या परेडसाठी रशियाकडून मोदी यांच्यासह शी जिनपिंग यांना आमंत्रित केले आहे.
- तर दुसरीकडे पहलगाम हल्ल्यानंतर पुन्हा एकदा मोदी यांनी कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी म्हणजेच सीसीएसची बैठक बोलावली आहे. दरम्यान मोदींनी अचानक त्यांचा रशिया दौरा रद्द केल्याने येत्या काही दिवसांत पाकिस्तानविरुद्ध मोठी कारवाई होण्याची शक्यता वाढली आहे.