राजकीय

85 वर्षाच्या म्हाताराच्या हातात तलवार देऊन काय उपयोग, हात थरथर करायला लागलेत

सध्या ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्या सुषमा अंधारे यांची सर्वत्र क्रेझ पहावयास मिळत आहे. मुलुख मैदानी तोफ म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. त्यांनी शिंदे सरकारवर घणाघाती टीका सुरू केली आहे.

अलीकडे सुषमा अंधारे ह्या कोल्हापूर दौऱ्यावर होत्या. दौऱ्यात त्यांनी मनसेवर जहरी टीका केली. त्यांच्या टीकेला मनसेने अत्यंत आक्रमकरीत्या उत्तर दिले आहे. मनसेने अंधारे यांचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. यात अंधारे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका केलेली आहे.
पंधरा-वीस वर्षांपूर्वी चे व्हिडिओ मनसे आता बाहेर काढत आहे. मनसेकडे जाणते नेतृत्व नाही, अशी टीका अंधारे यांनी अलीकडे केली होती. त्याला मनसेने लाव रे तो व्हिडिओ असे म्हणत प्रत्युत्तर दिले आहे. काही वर्षांपूर्वीचा हा व्हिडिओ आहे. त्यात अंधारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना उद्देशून म्हणतात, 85 वर्षाच्या म्हाताराच्या हातात तलवार देऊन काय उपयोग, हात थरथर करायला लागलेत. मनसेच्या या व्हिडिओवरून पुन्हा राजकारण तापण्याची शक्यता आहे.

Related Articles

Back to top button