क्राईम
नेहमी आई-वडिलांकडे जाण्याचा पत्नीचा हट्ट

- एका पतीने घरगुती वादातून पत्नीची गळा दाबून हत्या केली. यानंतर पतीने पोलीस ठाण्यात फोन करून हॅलो सर, मी पत्नीची हत्या केली आहे. मला अटक करा, असे सांगितले.
- यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी आरोपी पती रशीद अलीला अटक केली असून नाजमीनचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. मृतदेह सध्या शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
- अधिक माहितीनुसार, उत्तर प्रदेश येथील हापूरमधील मोहल्ला रफिक नगरमध्ये राहणाऱ्या रशीद अलीचे सुमारे ११ वर्षांपूर्वी नाजमीनसोबत लग्न झाले होते. रशीद आणि नजमीन यांना तीन मुले आहेत. यामधील मोठ्या मुलाचे वय ९ वर्ष आहे. रशीद अलीचे पत्नी नाजमीन सोबत नेहमी वाद व्हायचे. नाजमीन नेहमी आई-वडिलांकडे जाण्याचा हट्ट धरत असे. त्याला रशीदचा विरोध असायचा.