सोलापूर

एक गोळी डोक्यातून आरपार, तर दुसरी खिडकीच्या काचेवर

  • काल सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्राला हादरवून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील नामवंत न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी काल स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून, वैद्यकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. डॉ. वळसंगकर हे शहरातील एक प्रख्यात न्युरोसर्जन म्हणून ओळखले जात होते. 
  • डॉ. वळसंगकर यांनी आत्महत्या केली आहे. आम्ही घटनास्थळी जाऊन पाहणी केली असून त्यांनी डोक्यात गोळी घालून स्वत:चे जीवन संपवले. या प्रकरणाचा तपास सुरू असून अद्याप कारण समजू शकले नाही, असे सदर बाझार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांनी सांगितले. डॉक्टरच्या बेडरूममध्ये गोळीबाराची घटना घडली. त्यांच्या बंदुकीतून दोन गोळ्या झाडल्या गेल्या. 
  • झाडण्यात आलेल्या दोन गोळ्यांपैकी एक गोळी डॉक्टरांच्या डोक्यातून आरपार गेली आणि दुसरी गोळी खिडकीच्या काचेला लागली. दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. पोलिसांनी डॉक्टरांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून अहवालानंतर तपासाला अधिक गती मिळेल.

Related Articles

Back to top button