सोलापूर

सोलापूर ब्रेकिंग! आमदार विजयकुमार देशमुख छा गये

  • आपलं सोलापूर १६ खेड्यातून निर्माण झालेलं शहर म्हणून ओळख. ०५ मे १९९२ साली सोमपाची हद्दवाढ निश्चित होऊन त्यावेळी शहराच्या सीमेवर असलेली बाळे, कसबे सोलापूर, मजरेवाडी, शेळगी, दहिटणे, देगांव, कुमठे, केगाव, सोरेगाव (प्रतापनगर) आदीसह गावे आपल्या शहरांत सामील झाली. 
  • ०९ एप्रिल रोजी मंत्रालयात आमदार विजयकुमार देशमुख मालकांनी वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला सोलापूर शहर गुंठेवारी जागेच्या प्रश्नासंबंधी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत सोमपा प्रशासन व जिल्हा प्रशासन यांची मंत्रालयातील त्यांच्या दालनात उच्चस्तरीय बैठक घेतली. यावेळी सोलापूर शहरांतील गुंठेवारी खरेदी विक्री व नियमित करण्याच आदेश महसूल मंत्र्यांनी सोलापूर प्रशासनास दिले. 
  • आज त्याचाच एक भाग म्हणून धाराशिव व लातूर येथे गुंठेवारी प्रश्न यशस्वीरित्या सोडविणारे सोलापूर मनपाचे कर्तव्यदक्ष आयुक्त व प्रशासक डॉ. सचिन ओंबासे सरांनी सोलापूर शहराचे युवा नेते तथा माजी नगरसेवक डॉ. किरण देशमुख मालकांसह सोमपाचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे सर, संबंधित मनपा अधिकारी वर्गासोबत शेळगी, दहिटणे भागातील गुंठेवारी क्षेत्राची पाहणी दौरा करीत या गुंठेवारी नियमित कामाची प्रत्यक्ष कामास सुरूवात केले.
  • हद्दवाढीनंतर १९९४ साली सदर भागातील बांधकामाचे सर्व्हे करून खुल्या भूखंडावर सोमपाने कर आकारणी सुरू केली. ती आजतायगत तीच कर प्रणाली लागू असून त्यात वेळोवेळी करवाढ झालेली आहे. 
  • सदर गुंठेवारी प्लॉटधारकांना स्वतंत्र मोजणी करण्यास अडचण असल्याने येथे बांधकाम परवाना मिळू शकत नाही. त्यामुळे येथील रहिवाशांना नाईलाजास्तव अनियमित बांधकाम करून रहावे लागले. बांधकाम करताना अनेक लोकांना बँक कर्ज मिळत नसल्याने सावकारी कर्ज काढून पक्की बांधकामे केली. काहींनी सावकारी कर्ज फेडले तर काहींची सावकारीत घरे गेली.
  • सर्वांना पक्क घर बांधण्याचं स्वप्न असतं पण ते बिना कर्ज अशक्य असते. अशावेळी हद्दवाढ भागाच्या परिघाच्या बाहेर सद् ग्रामीण भागात नवीन नगरी वसू लागल्या क्लिअर टाईटल म्हणून अवाच्या सव्वा दराने खरेदी करून पक्क्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सदर गुंठेवारी भागातील व शहरांतील लोकांचा कल वाढला. अवघ्या काही मिनिटात बस स्थानक, रेल्वे स्थानक, महामार्गालगत अशा जाहिराती पाहून कर्ज घेऊन लोक आपलं मूळ शहरांतील गुंठेवारी जागा विक्री करीत शहरांबाहेर आपलं पक्क घर घेऊ लागले.
  • गुंठेवारी नियमित झाले तर एकाच जागेची अनेकांना नोटरीवर कब्जा पावती खरेदी देऊन होणारी फसवणूक टळेल. गुंठेवारी नियमित झाल्यावर स्वतंत्र प्लॉट मोजणी होईल व बांधकाम परवाने मिळतील. त्यामुळे बँक कर्ज उपलब्ध होईल आपल्या स्वतःच्या जागेवर सदर गुंठेवारी प्लॉटधारकांना आपल्या स्वतःचे पक्के घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण होईल. या गुंठेवारी नियमित निर्णयाने जागेचे बाजार मूल्य वाढून गुंठेवारी प्लॉट धारक लखपती होतील यात तिळमात्र शंका नाही. 
  • आमदार विजयकुमार देशमुख मालकांच्या यशस्वी प्रयत्नाने गुंठेवारी नियमित साठी लढणाऱ्या सर्वसामान्य लोक, सामाजिक संघटना प्रमुख, पक्षीय नेते आदीसह सर्वांच्या अनेक वर्षांच्या मागणीला गुंठेवारी नियमित निर्णयामुळे भाजपा व महायुती सरकारचे व आमदार महोदयांचे सर्वत्र कौतुक होत असून या निर्णयाने सोलापूर शहरांतील गुंठेवारी प्लॉट धारकांसह बांधकाम क्षेत्रासही येणाऱ्या काळात अच्छे दिन येणार हे निश्चित आहे.

Related Articles

Back to top button