देश - विदेश
ब्रेकिंग! तरुणींना छेडल्यास चौकातच ठार करू

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ ठरत आहेत. गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी ते कुठलाही निर्णय घेण्यास मागेपुढे बघत नाहीत. गेल्या काही वर्षात उत्तर प्रदेशात बुलडोझरसह विविध प्रकारची कारवाई केल्यामुळे राज्यातील गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
यातच आता योगी यांनी तरुणींची महिलांची छेड काढणाऱ्यांना किंवा गंभीर गुन्हे करणाऱ्यांना थेट इशारा दिला आहे.
कानपूरमधील व्हीएसएसडी कॉलेजच्या मैदानावर झालेल्या प्रबुद्धजन संमेलनात बोलताना योगी आदित्यानाथ म्हणाले, आयसीसीसीअंतर्गत कानपूरसह १८ शहरे सुरक्षित शहर बनण्याच्या मार्गावर आहेत. आता उत्तर प्रदेशात गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले आहेत. गुन्हेगार गुन्हे करण्यापूर्वी तीनदा विचार करतात. आता एखाद्या चौकात तरुणीची छेड काढली किंवा एखाद्या गुन्हेगाराने दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला तर तो सीसीटीव्हीत कैद होईल आणि पुढच्याच चौकात त्याला ठार केले जाईल, असा जबर इशारा योगी यांनी दिला आहे.