महाराष्ट्र
ब्रेकिंग! महिला कलाकारांची अब्रु वेशीवर का टांगता ?

- भाजप आमदार सुरेश धस यांनी इव्हेंटबाजीचा परळी पॅटर्न सुरु असल्याचा आरोप केला होता. धस यांनी पत्रकारांशी बोलताना मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीचे नाव घेतले होते. या आरोपांना प्राजक्ताने पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली तसेच या प्रकरणात धस यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी देखील प्राजक्ताने केली.
- पत्रकार परिषद सुरु होण्याआधीची काही सेकंद जर पाहिलं तर प्राजक्ताचा राग, चिडचिड आणि तिचे भांबावलेपण स्पष्ट दिसत होते. तिच्यावर झालेल्या आरोपांबद्दल तिच्या मनात जी घुसमट सुरु होती, ती तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होती. मात्र प्राजक्ताने स्वत:चा राग अनावर न होऊ देता तिने परिस्थिती सांभाळून घेण्याचा प्रयत्न केला आणि शांतपणे तिने प्रत्रकारांशी बोलण्यास सुरुवात केली.
- प्राजक्ताने कठोर शब्दात तिच्यावरील आरोपांचा समाचार घेतला. ती म्हणाली, माझ्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल धस यांचा निषेध करते. तुमचे राजकारण तुम्हाला लखलाभ. आपला टीआरपी वाढविण्यासाठी कोणत्याही थाराला जातात. तुमच्या राजकारणासाठी आमच्या सारख्या महिला कलाकारांची अब्रु वेशीवर का टांगता ?, असा संतप्त सवाल करताना प्राजक्ताला अश्रू अनावर झाले.



