देश - विदेश
दोन दिवस बँका बंद; लवकर उरका तुमची कामे

बँक ग्राहकांना एक महत्वाची बातमी आहे. तुमच्या शहरातील बँका दोन दिवस बंद राहणार आहेत. कारण शनिवारी 19 नोव्हेंबर रोजी बँक कर्मचारी संपावर जाणार असल्याची माहिती ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशनने दिली आहे.
सगळ्या बँक कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा संप पुकारला आहे. याचा परिणाम बँकेच्या कामकाजावर होणार आहे. तिसऱ्या शनिवारी ही बँका बंद राहणार आहेत. याचाच अर्थ शनिवार व रविवार असे दोन दिवस बँका बंद राहतील. यामुळे तुम्हाला बँकेतील कामे पटापट उरकून घ्यावी लागतील. तसेच एटीएममध्ये सुद्धा कॅश उपलब्ध असणार नाही.
यामुळे तुमची गैरसोय होण्याची शक्यता आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी असोसिएशनने संप पुकारला आहे. या काळात ऑनलाईन व्यवहार सुरू राहतील. मात्र इतर सेवेवर याचा परिणाम होईल. त्यामुळे बँकेतील कामे लवकर उरकून घ्या.