हवामान
ब्रेकिंग! महाराष्ट्रासाठी पुढील चार दिवस महत्त्वाचे

- पुढील चार दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्याच्या अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस अपेक्षित असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई शहर, उपनगरे, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. या भागांत अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
- पुणे, अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहून विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस होऊ शकतो. सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. जालना, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर संभाजीनगर, बीड आणि हिंगोली येथे जोरदार पाऊस अपेक्षित आहे.



