देश - विदेश

ब्रेकिंग! जम्मू-काश्मीरमध्ये मोठी कारवाई

  • जम्मू-काश्मीरमधील शेपियान येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. शोपियानच्या जंगलात चार दहशतवादी लपले असल्याच्या गु्प्त माहितीच्या आधारे सुरक्षा दलाने ही कारवाई केली.
  • दहशतवादी शोपियानच्या जामपाथरीमध्ये लपले होते. लष्कर-ए-तोयबाशी संबंधित हे दहशतवादी असल्याचीही माहिती मिळत आहे. दहशतवादी जंगलात लपले असल्याची माहिती मिळाल्यानतंर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना घेरले. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला जवानींनीही चोख प्रत्युत्तर दिले. यात तीन दहशतवादी ठार झाल्याची बातमी आहे.
  • हे दहशतवादी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ला करणाऱ्यांशी संबंधित आहेत की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या चकमकीत दहशतवादी शाहिद अहमद ठार झाल्याचीही माहिती मिळत आहे. 

Related Articles

Back to top button