राजकीय
ब्रेकिंग! सोलापूर दक्षिणमधून काँग्रेसकडूनही उमेदवार, ही टायपिंग मिस्टेक

- महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा काही आणखीही सुटलेला दिसत नाही. कधी जागावाटप फायनल झाल्याचे सांगितले जाते, तर कधी काही जागांवरून रुसवे फुगवे असल्याच्या चर्चा रंगतात. अशातच आता ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये काही जागांवर वाद असल्याचे समजते. विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर होताना दिसत आहे. मात्र सोलापूर दक्षिण जागेवरून शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये जोरदार वाद झाला होता. यानंतर ठाकरे गटाकडून सोलापूर दक्षिण जागेवर अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र काँग्रेसने आपली चौथी यादी जाहीर करताना त्याच ठिकाणी दिलीप माने यांना उमेदवारी दिली आहे. याप्रकरणी आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला इशारा दिला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
- राऊत म्हणाले की, ठाकरेंची शिवसेना आणि इतर मित्रपक्ष या सर्वांचे समाधन होईल, अशाप्रकारचे जागावाटप आमच्याकडून होत आहे. त्यामध्ये 90 चा, 95 चा आणि 100 चा फॉर्म्युला या बातम्यांमध्ये काही तथ्य नाही. आम्ही सगळे एकत्र लढत आहोत. पण आज मला पाहायला मिळाले की, ज्या सोलापूर दक्षिण जागेवर शिवसेनेने उमेदवार दिलेला आहे. त्याच जागेवर काँग्रेसच्या यादीत उमेदवार दिल्याचे दिसत आहे. त्यामुळे मी असे मानतो की, ही टायपिंग मिस्टेक आहे. पण अशा टायपिंग मिस्टेक आमच्याकडूनही होऊ शकतात, असा इशारा राऊत यांनी दिला.



