देश - विदेश

ब्रेकिंग! भारताला कोंडीत पकडण्याचा डाव पाकिस्तानवरच उलटला

  • पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर कठोर निर्बंध लागू केले. भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू जलवाटप करार स्थगित केला. तसेच पाकिस्तानी जहाजांना भारतीय बंदरांवर येण्यास मज्जाव केला. या घटनेला आता बरेच दिवस झाले आहेत. भारताच्या या कठोर निर्णयानंतर पाकिस्ताननेही भारताविरोधात काही निर्णय घेतले होते.
  • या निर्णयांतर्गत पाकिस्तानने भारतासाठी त्यांचं हवाई क्षेत्र बंद केले होते. दरम्यान, आता पाकिस्तानने भारताविरोधात घेतलेला हा निर्णय त्यांच्याच अंगलट आला आहे. कारण पाकिस्तानला या निर्णयामुळे तब्बल 127 कोटींचा तोटा झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद करणं चांगलेच महागात पडले आहे. पाकिस्तानने भारताच्या विमानांना त्यांच्या हद्दीत प्रवेश न दिल्याने तब्बल 127 कोटींचे नुकसान झाले आहे. भारताने 23 एप्रिल रोजी सिंधू जलवाटप करार स्थगित केल्यानंतर पाकिस्तानने हा निर्णय घेतला होता.
  • भारतविरोधी घेतलेल्या या निर्णयांचा पाकिस्तानवर नेमका काय परिणाम झाला? याची माहिती पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी त्यांच्या संसदेत दिली. या माहितीनुसार पाकिस्तानने त्यांचे हवाई क्षेत्र भारतासाठी बंद केल्यामुळे रोज शंभरपेक्षा जास्त विमानोड्डाण प्रभावित झाले. त्याचाच परिणाम म्हणून 24 एप्रिल ते 30 जून या काळात 4.10 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे (साधारण 127 कोटी भारतीय रुपये) नुकसान झाले आहे. 

Related Articles

Back to top button