सोलापूर

सोलापूर ब्रेकिंग! लग्नात योग्य मानपान केला नाही आणि दोन तोळे सोने घालायला पाहिजे होते

  • सोलापूर (प्रतिनिधी) विवाहिता ही सासरी नांदत असताना सासरकडच्या मंडळींनी वेळोवेळी शारीरिक व मानसिक त्रास देऊन मारहाण करून विवाहितेकडून काम करून घेत पोटभर जेवण न देता जीवे मारण्याची धमकी दिली.तसेच लग्नात योग्य मानपान केला नाही व दोन तोळे सोने घालायला पाहिजे होते. असे म्हणत विवाहितेला व तिच्या मुलीला घरातून हाकलून दिल्याची फिर्याद खुर्शीद तौफिक शेख (वय-३०,रा.हत्तुरेवस्ती विमानतळ समोर) यांनी सलगर वस्ती पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पती तौफिक शेख, सासरे हरून शेख,सासू इन्मात शेख व शाहीन शेख (सर्व.रा.जानकर वस्ती,देगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार उपासे हे करीत आहेत.

Related Articles

Back to top button