सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात विष्णू चाटेचा भलताच कांड

मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेच्या न्यायालयीन कोठडीमध्ये वाढ करण्यात आली आहे. आज आरोपी चाटेची दोन दिवसांची कोठडी संपली होती. त्यामुळे आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते.
आज झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडी वाढवण्याचे आदेश दिले. विष्णु चाटेच्या न्यायालयीन कोठडीमध्ये सहा दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे चाटे आता 18 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीमध्ये राहणार आहे. तर दुसरीकडे चाटे हा वाल्मिक कराड याचा मावसभाऊ असल्याची देखील माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
जेव्हा संतोष देशमुख यांचे अपहरण झाले, तेव्हा धनंजय देशमुख यांच्याशी चाटेसोबत बोलणे झाले होते. चाटेने त्यांना 15 मिनिटांमध्ये सोडतो, असे सांगितले होते. त्यावेळी दोघांमध्ये 35 फोन झाले. मात्र देशमुख यांची हत्या झाली. तेव्हा चाटे फोन बंद करुन फरार झाला होता. पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करत आतापर्यंत आठ जणांवर कारवाई केली आहे.