क्राईम

ब्रेकिंग! खुनाचा बदला खून

  • राज्यात एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली असून यवतमाळच्या ओम बुटलेवर तिघांनी तलवार आणि चाकूने जीवघेणा हल्ला केला.
  • या हल्ल्यात ओमचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्या मृतदेहाचे यवतमाळ येथे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर ओम याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, या प्राणघातक हल्ल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेत अवधूत सूर्यभान तिगलवाड (वय ५२), अक्षय अवधूत तिगलवाड (वय २५), रवी दत्तात्रय गुंडेवाड (वय २३), अर्जुन मोतीराम पोयाम (वय २३), देवानंद सुभाष मरुडवाड (वय २३) वर्ष आणि उमेश प्रल्हाद काळे (वय २४) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
  • दोन वर्षापूर्वी आर्णी शहरात दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत क्षुल्लक कारणावरून ओम आणि दत्ता वानखेडे यांनी अजय अवधूत तिघलवाड (वय २२) या युवकाचा खून केल्याची घटना घडली होती. सध्या दत्ता वानखडे खुनाच्या घटनेत अजूनही कारागृहात आहे. या घटनेत मुलाला गमावलेल्या बापाच्या मनात आधी पासूनच खदखद होती. अशात मृतक ओम पंधरादिवसा आधी कारागृहातून जामिनावर बाहेर आला. 
  • ओम याला बहुतेक आपल्याला जीवाने मारणार याची जाणीव झाल्याने पत्नीला आणि बाळाला सोबत घेऊन पुण्याला काम करण्यासाठी ट्रॅव्हल्सने जाण्याच्या तयारीत होता. तेवढ्यात त्याला हल्लेखोरांनी तलवार आणि चाकूने सपासप वार करून गंभीर जखमी केले. आरोपींच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न ओम याने केला. मात्र, त्याला कसली तर ठोकर लागली आणि तो खाली पडला. त्याच्यावर सपासप वार करण्यात आले. त्यामुळे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या ओमच्या पत्नीने आरडाओरड केल्यानंतर रस्त्यांवरील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत गंभीर ओमला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. 
  • मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले. पण उपचारादरम्यान ओमचा मृत्यू झाला.
  • अजय या एकुलत्या एका मुलाचे काही कारण नसताना हकनाक बळी घेतला याची खंत अजय याचे वडील अवधूत तिगलवाड यांना होती. मुलाच्या मारेकर्‍याला कोणत्याही परिस्थितीत सोडायचे नाही या मानसिकतेतून अवधूत हे ओमच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवून होते. काल पुण्याला जाण्यासाठी ट्रॅव्हल्सची वाट पाहताना त्याच दरम्यान अवधूत यांच्यासह पाच जणांनी ओमवर प्राणघात हल्ला केला. विशेष म्हणजे ज्या परिसरात ओम आणि त्याच्या साथीदाराने अजय तिघलवाड याला मारले होते. त्याच परिसरात ओमवर प्राणघातक हल्ला करण्यात आला.
  • दरम्यान पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सहा आरोपींना अटक केली आहे. न्यायालयाने या आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. आरोपींच्या चौकशीतून पुढे येणारी माहिती महत्त्वाची ठरणार असून अजून आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. 

Related Articles

Back to top button