महाराष्ट्र

ब्रेकिंग! मराठ्यांचा इतिहास दाखवायला औरंगजेबाची कबर राहिलीच पाहिजे

  • शिवाजी पार्क मैदानावर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा झाला. मेळाव्याआधीच जोरदार बॅनरबाजी करत मनसेने वातावरण तापवले आहे. दरवर्षी गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे भव्य मेळावा घेतात. या मेळाव्यामधून राज ठाकरे सरकारवर तोफ डागतात. मनसेचे ही परंपरा मागील 19 वर्षांपासून सुरू आहे. 
  • आज देखील शिवाजी पार्क मैदानावर राज ठाकरे यांची भव्य सभा पार पडली. यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मनसे सैनिकांनी हजेरी लावली. राज ठाकरेंनी उपस्थित जनसमुदायाला मेळाव्यातून संबोधित केले.
  • औरंगजेबाच्या मुद्द्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, आम्ही कोणाला गाडलंय ते सांगायला नको. लहान -लहान मुलांना घेवून तिकडे गेले पाहिजे. त्यांना सांगितले पाहिजे, महाराजांनी याला गाडले. पुढच्या पिढीला आम्ही काय इतिहास सांगणार? महाराजांना विचारूनच औरंगजेबाला तिथं गाडले असेल. जातीपातीचे विषय काढून विषय भरकटवले जातात, असे देखील राज ठाकरेंनी म्हटले.

Related Articles

Back to top button