क्राईम

ब्रेकिंग! संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट

  • मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात गेल्या काही दिवसांत नव्या-नव्या अपडेट येत आहेत. या प्रकरणात आत्तापर्यंत दोन सुनावण्या पूर्ण झाल्या आहेत. दरम्यान, आता नव्या व्यक्तीची एन्ट्री झाली आहे. या प्रकरणातील प्रमुख तीन आरोपींनी कराड नामक व्यक्तीचे नाव घेतले आहे. या व्यक्तीमुळेच देशमुखांची आम्ही हत्या केली, असे त्यांनी सांगितले आहे.
  • संतोष देशमुखांचे अपहरण करुन त्यांची हत्या करणारा प्रमुख आरोपी सुदर्शन घुले याने पोलिसांना जबाब देताना सांगितले की, सुग्रीव कराड याने देशमुख यांना सुदर्शन घुलेला मारहाण करण्यास सांगितले. त्यामुळे देशमुखांनी आवादा कंपनीच्या वॉचमनला धमकावणाऱ्या घुलेच्या कानशिलात लगावली.
  • पण कानशिलात लगावल्याने घुले आणि त्याचा आका वाल्मिक कराड यांची मोठी बदनामी झाली होती. या बदनामीचा बदला घेण्यासाठीच कानशिलात लगावणाऱ्या देशमुखांचे आम्ही अपहरण करुन हत्या केली, असा जबाब जयराम चाटे आणि महेश केदार या दोघा आरोपींनी पोलिसांसमोर दिला आहे.
  • या दोघांना ही माहिती कृष्णा आंधळे या फरार आरोपीने दिली होती. म्हणजेच आंधळेच्या माहितीवरुन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार यांनी देशमुख यांचा काटा काढण्याचा प्लॅन बनवला आणि हा प्लॅन त्यांनी प्रत्यक्षात आणला. दरम्यान, आता सुग्रीव कराडचे या प्रकरणात थेट नाव आल्याने तो यावर काय स्पष्टीकरण देतोय, हे पाहावे लागणार आहे.

Related Articles

Back to top button