राजकीय

राज की उद्धव ठाकरे, अजितदादा की शिंदे, लाडके कोण?

  • एका मराठी वृत्तवाहिनीला मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत उद्धव ठाकरे, राज ठाकरे, अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासह काही मंत्र्यांबद्दल रॅपिड फायर प्रश्न विचारण्यात आले. त्यावर फडणवीस यांनी रोखठोक उत्तरे दिली आहेत.
  • फडणवीस यांची भन्नाट उत्तरे-
  • उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत पुन्हा युती होऊ शकते का?
  • देवेंद्र फडणवीस : नाही.
  • लाडके उपमुख्यमंत्री कोण, अजितदादा की एकनाथ शिंदे?
  • देवेंद्र फडणवीस : दोघेही माझे लाडके आहे. मी पण त्यांचा लाडका आहे. त्यामुळे आम्ही लाडके मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहोत.
  • लाडके ठाकरे कोण? उद्धव की राज ठाकरे?
  • देवेंद्र फडणवीस : ठाकरे असे आहेत की, त्यांना आपण लाडके म्हणायचे आणि त्यांनी आपल्याला दोडके म्हणायचे… कुठे भानगडीत पडता… गेल्या पाच वर्षांत उद्धव ठाकरेंसोबत काहीच संबंध राहिलेला नाही. माझा राज ठाकरेंसोबत संबंध राहिलेला आहे. उद्धव टाकरेंनी संबंध तोडून टाकले आहेत. मारामारी नाही… समोर आले की आम्ही चांगले बोलतो, नमस्कार करतो. मात्र, काहीही संबंध राहिले नाहीत.
  • लाडका मंत्री कोण? गिरीश महाजन की नितेश राणे?
  • देवेंद्र फडणवीस : लाडका मंत्री योजना सुरू केलेली आहे. त्याचे निकष ठरलेले आहेत. त्याप्रमाणे अर्ज घेतलेले आहेत. त्याची कार्यवाही सुरू आहे. ही कार्यवाही झाल्यावर सांगतो.

Related Articles

Back to top button