क्राईम
ब्रेकिंग! देवदर्शन ठरले शेवटचेच

- पिकअप कार आणि ट्रकचा आज पहाटे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात अकरा भाविकांचा मृत्यू झाला असून 14 जण जखमी झाले आहेत. 9 जणांची प्रकृती गंभीर आहे. मृतांमध्ये सात लहान मुले आणि दोन महिलांचा समावेश आहे. या भीषण अपघातात भाविकांनी प्राण गमावले आहेत. ते मंदिरात दर्शन घेऊन परतत होते. त्यावेळी हा भयानक अपघात झाला.
- राजस्थानातील दौसा येथे हा भीषण अपघात झाला आहे. भाविकांच्या वाहनाची आणि एका ट्रकची जोरदार धडक झाली. या अपघातात अकरा जणांचा मृत्यू झाला.
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भाविक एका पिकअप वाहनातील होते. या वाहनाची आणि ट्रकची जोरदार धडक झाली. सर्व भाविक उत्तर प्रदेशचे असल्याची माहिती आहे. भाविक येथील खाटू श्यामजी आणि सालासर बालाजीचे दर्शन घेऊन घरी निघाले होते. अपघात कुणाच्या चुकीमुळे झाला याचा तपास केला जात आहे.



